रत्नागिरी- काष्ठशिल्पांसह कलात्मक वस्तू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- काष्ठशिल्पांसह कलात्मक वस्तू
रत्नागिरी- काष्ठशिल्पांसह कलात्मक वस्तू

रत्नागिरी- काष्ठशिल्पांसह कलात्मक वस्तू

sakal_logo
By

आली दिवाळी---लोगो

फोटो ओळी
-rat१३p२.jpg- KOP२२L५६१६०
रत्नागिरी : के. प. अभ्यंकर मूकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारलेली काष्ठशिल्पे.
-rat१३p३.jpg-KOP२२L५६१६१ रत्नागिरी : पणत्यांचे रंगकाम करताना विद्यार्थी.
-rat१३p४.jpg- KOP२२L५६१६२ रत्नागिरी : प्रथमच बनवलेल्या शोभिवंत वस्तूंसमवेत विद्यार्थिनी.
---------------
काष्ठशिल्पांसह कलात्मक शोभिवंत वस्तू लक्ष्यवेधी

मूकबधिर विद्यालय ; विद्यार्थ्यांनी बनवल्या शोभिवंत वस्तू, शुभेच्छापत्रे

मकरंद पटवर्धन ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः तोडलेल्या झाडांची खोडे, लाकडांचे तुकडे यांचा कलात्मक वापर करत येथील के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काष्ठशिल्प, पेपरवेट बनवले आहेत. या काष्ठशिल्पांना सुरेख पॉलिश केले असून त्यावर वारली चित्रे साकारली आहेत. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षमतेनुसार काम करत आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे पणत्या, आकाशकंदिल, मातीपासून बनवलेल्या मावळ्यांच्या प्रतिकृती, शुभेच्छापत्रं आणि कापडी पिशव्या आदी विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याचे काम शाळेत सुरू आहे.
दिवाळीनिमित्त गाडीतळ येथील मूकबधिर विद्यालयाचे यंदा ३७ वे हस्तकला प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्याकरिता सध्या शाळेत लगबग सुरू आहे. यापूर्वी पेपर क्लिविंगची शुभेच्छापत्रं, लाकडी खेळणी, करवंटीपासून वाद्ये अशा नवनवीन प्रकारच्या वस्तू विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. कलात्मकतेने मातीपासून बनवलेले छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे छोटे पुतळे, सुगंधी उटणे, कापडी पिशव्या, दुपटी, लाकडी वस्तू, पेन स्टँड, मोत्यांचे दागिने, इको फ्रेंडली आकाशकंदील, शो-पीस बनवले आहेत.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना समाजाशी संवाद साधता येतो. व्यवहारज्ञान कळल्याने भावी काळात पुनर्वसनासाठी ही गोष्ट महत्त्वाची ठरते. रत्नागिरीकरांचा दरवर्षी या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळतो. त्याचा योग्य आराखडा बनवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांकडे कोणत्या ना कोणत्या कलेचे अंग असतेच. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण दिल्यावर सुरेख वस्तू साकारल्या जातात. आखीव, रेखीव आणि सुबक वस्तू लोकांच्या पसंतीस उतरतात. या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी रूपेश झोरे व यश देसाई यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तसेच मुख्याध्यापक गजानन रजपूत, रमेश घवाळी, सीमा मुळ्ये, उपासना गोसावी, राजकुमार कसबे यांच्यासह दीप्ती खेडेकर, हनुमंत गायकवाड आणि साक्षी वासावे यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन मिळाले आहे.
----------
कोट
शाळेच्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शाळा, संस्थेकडून योग्य मार्गदर्शन, सहकार्य केले जाते. शाळेतच शिवणकाम, लाकूडकाम, स्क्रीन प्रिंटींग, मातीकाम आदी कौशल्ये शिकवली जातात. प्रत्येकाची आवड व कल पाहून विद्यार्थी पुढेत जात असतात. त्यामुळेच शाळेच्या बहुतांशी विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन झाले आहे.
- गजानन रजपूत, मुख्याध्यापक


चौकट १
२० पासून प्रदर्शन
दिवाळीनिमित्त मूकबधिर विद्यालयाचे ३७ वे हस्तकला प्रदर्शन २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. याचे उद्घाटन सीए हेरंब पटवर्धन आणि शहर वाचनालय, महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. मोहिनी पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १०:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत शाळेच्या सभागृहात हे प्रदर्शन होणार आहे. रत्नागिरीकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेतर्फे केले आहे.