भोसले पॉलिटेक्निकला पुन्हा एनबीए मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसले पॉलिटेक्निकला पुन्हा एनबीए मानांकन
भोसले पॉलिटेक्निकला पुन्हा एनबीए मानांकन

भोसले पॉलिटेक्निकला पुन्हा एनबीए मानांकन

sakal_logo
By

भोसले पॉलिटेक्निकला
पुन्हा एनबीए मानांकन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमधील सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीनही विभागांना एनबीए पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत पुन्हा एकदा एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे.
संस्थेच्या या तीनही विभागांना वर्ष २०१९ मध्ये पहिल्यांदाच एनबीए मानांकन प्राप्त झाले होते. अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच स्थापनेपासून केवळ पाच वर्षांच्या कालावधीत हे मानांकन मिळवण्याचा बहुमान संस्थेने प्राप्त केला होता. एनबीए मानकांनुसार संस्थेची गुणवत्ता निर्धारित करण्यासाठी दर तीन वर्षांनी संस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्यात येते. त्यानुसार ऑगस्ट २०२२ मध्ये एनबीएच्या तज्ञ समितीने संस्थेचे मूल्यांकन केले होते. त्याचा निकाल जाहीर झाला असून संस्थेच्या सिव्हील, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल या तीनही विभागांनी पुन्हा एकदा एनबीए मानांकन प्राप्त करत बाजी मारली आहे. एनबीए मानांकित संस्था म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी असते. संस्थेच्या या यशामध्ये संस्थेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व पालक यांचे बहुमूल्य योगदान आहे. संस्थेच्या यशाबद्दल कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांनी प्राचार्य गजानन भोसले, सर्व विभाग प्रमुख व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.