संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

संक्षिप्त

पोलिसावर हल्ला;
संशयितास कोठडी
वेंगुर्ले ः कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या मोहनदास विनायक आडकर याला वेंगुर्ले पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता २१ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपीतर्फे अॅड. मनीष सातार्डेकर यांनी काम पाहिले. आडकर यांच्या पत्नीने वेंगुर्ले पोलिस ठाण्यात पती आपणास मारहाण करत असल्याची तक्रार देत जीविताला धोका असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आडकर यांची पत्नी मेघना हिला घरी सोडण्यासाठी व तिच्या पतीला समज देण्यासाठी गेलेल्या हवालदार रुपा वेंगुर्लेकर यांच्यावर आडकर याने हल्ला केला होता. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. अधिक तपास सावंतवाडीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव, पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर करीत आहेत.

हॅलोजनचा
वेंगुर्लेत स्फोट
वेंगुर्ले ः सहा महिन्यांपूर्वी उद्‍घाटन करण्यात आलेल्या पवनपुत्र भाजी मार्केटमधील एका हॅलोजनचा स्फोट मंगळवारी रात्री झाला. या स्फोटामुळे भाजी व्यापारी व ग्राहकही घाबरले. भीतीने काहीजण पवनपुत्र मार्केटमधून बाहेर धावले. वेंगुर्ले पालिकेशी संपर्क साधला असता इलेक्ट्रिक वस्तूंबाबत केव्हा काय घडेल हे सांगणे कठीण आहे. कधी कधी करंट जास्त आल्याने असा स्फोट होऊ शकतो, असे सांगण्यात आले.

एसटी कर्मचारी
आंदोलन टळले
कणकवली ः एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागात आधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला अदा केले जाते; परंतु विभागीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०२२ चे वेतन १२ तारखेपर्यंत न झाल्यास १३ पासून आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता; मात्र बुधवारी दुपारनंतर पगार झाल्याने तूर्त हे आंदोलन टळले आहे. ऑक्टोबरमध्ये येणारा दिवाळी सण पाहता या सणाआधी कर्मचाऱ्यांना आगाऊ सण उचल, बोनस व वेतन आगाऊ अदा करणे आवश्यक असताना त्यापासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे १२ ला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आमचे देय वेतन अदा न केल्यास १३ ला आंदोलनासारख्या मार्गाचा अवलंब केला जाईल, असे म्हटले होते.