चिपळूण-आवड लक्षात घेऊन करिअर निवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-आवड लक्षात घेऊन करिअर निवडा
चिपळूण-आवड लक्षात घेऊन करिअर निवडा

चिपळूण-आवड लक्षात घेऊन करिअर निवडा

sakal_logo
By

- ratchl१३२.jpg-KOP२२L५६२०९ सती चिंचघरी ः करिअरविषयी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मिनल ओक.
------------

आवड लक्षात घेऊन करिअर निवडा
प्रा. मिनल ओक ; सती विद्यालयात करिअरचे धडे
चिपळूण, ता. १३ ः येथील लायन्स क्लब मार्फत न्यू इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात करिअर घडवितानाचे धडे देण्यात आले. प्रा. मिनल ओक यांनी करिअर कसे निवडावे, त्यासाठी काही टिप्स दिल्या. करिअर घडवण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारा, स्वतःशीच बोला, मला नक्की काय करायचं आहे, माझी आवड कशामध्ये आहे, योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यावा, विकासाचे समतोल कसे राखावे याबाबतचे त्यांनी धडे दिले.
प्राचार्य वरेकर यांनी कार्यक्रमाचा हेतू व संस्थेची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्यानंतर प्रा. डॉ. मीनल ओक-पाथरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून करिअर कसे घडवावे, याबाबत सहज आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी समाजात आपली ओळख कशी निर्माण करावी, मीच जिंकणार हा आत्मविश्वास कसा निर्माण करावा, तणाव आणि चिंता यांचे समायोजन कसे केले पाहिजे. अशा विविध मुद्द्यांना हात घालून उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी सेवा सप्ताहाचे प्रमुख माजी अध्यक्ष श्रीनिवास परांजपे यांनी मोलाचे सहकार्य केले. कलाशिक्षक टी. एस. पाटील यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, चंद्रकांत मांडवकर, जगदीश वाघुळदे, ज्युनिअर विभाग प्रमुख जगदाळे आदी उपस्थित होते.