मंडणगड-एकवटणार सर्व कुणबी संघटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड-एकवटणार सर्व कुणबी संघटना
मंडणगड-एकवटणार सर्व कुणबी संघटना

मंडणगड-एकवटणार सर्व कुणबी संघटना

sakal_logo
By

मेळाव्यात कुणबी समाज एकवटणार
कुणबी युवक मंडळ दापोलीतर्फे रविवारी मुंबईत आयोजन
मंडणगड, ता. १३ ः मंडणगड, दापोली, खेड तालुक्यातील सर्व कुणबी संघटना एकत्र आणून कुणबी युवक मंडळ दापोली यांनी कुणबी मेळावा १६ ऑक्टोबरला मुंबई येथे दादर छबिलदास हॉल येथे दुपारी ४ वाजता आयोजन केले आहे. विविध संघटना आणि विविध पक्षात सक्रिय कुणबी बांधव या निमित्ताने एकत्र येत आहेत. मंडणगड, दापोली, खेड तालुक्यातील समाजाचे माजी आमदार समाजनेते श्यामराव पेजे, अॅड. जी. डी. सकपाळ आणि तु. बा. कदम यांनी केलेली सामाजिक आणि राजकीय वाटचालीस आदर्श मानून कुणबी शक्ती एकवटावी यासाठी तालुक्यातील कुणबी संघटना सहभागी होत आहेत. यात प्रामुख्याने कुणबी समाजोन्नती संघ आणि या संस्थेच्या तिन्ही तालुक्यातील मुंबई ग्रामीण शाखा, युवक मंडळे, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ, अखिल महाराष्ट्र कुणबी युवक महासंघ, कुणबी ऋणानुबंध सेवा संघ, दापोली कुणबी सेवा संघ, हितवर्धनी सेवा संघ, कुणबी विकास मंडळ मुलुंड, कुणबी विकास मंच दापोली, कुणबी युवा प्रतिष्ठान, ओबीसी संघर्ष समिती, कुणबी युवा मुंबई, कुणबी स्वराज्य क्रांती सेना,खेड कुणबी सेवा संघ, संतोष अबगूल प्रतिष्ठान, सुमित्रा पतपेढी, दापोली कुणबी सहकारी पतपेढी, कुणबी राजकीय संघटन समिती, तसेच समाजातील इतर घटक संघ, राजकीय नेते, गाव मंडळे, सर्व कुणबी पतपेढी सहभागी होत असल्याची माहिती कुणबी युवक मंडळ दापोली युवा अध्यक्ष प्रमोद खेराडे यांनी दिली.