rat1315.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat1315.txt
rat1315.txt

rat1315.txt

sakal_logo
By

महिलेची ३१ हजारांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी, ता. १३ ः मोबाईलवर अज्ञाताने क्रेडिट कार्ड क्लोज करण्याचे सांगून महिलेने आलेला ओटीपी दिल्यानंतर तिच्या बॅंक खात्यातील ३० हजार ९०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मा (पुर्ण नाव, गाव माहित नाही) असा संशयित आहे. ही घटना सोमवारी (ता. ३) दुपारी अडीचच्या सुमारास मजगाव रोड, कोकणनगर, रत्नागिरी) येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता दिलीप राठोड (वय ३५, रा. मजगाव रोड-कोकणनगर) यांच्या मोबाईलवर अज्ञात शर्मा नामक व्यक्तीने फोन करुन तुमचे क्रेडिट कार्ड क्लोज करेन, असे सांगून त्यांची दिशाभूल केली. त्यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी अज्ञात व्यक्तीने प्राप्त केला व प्राजक्ता यांच्या बॅंक खात्यातील ३० हजार ९०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी प्राजक्ता राठोड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.
------
भाट्ये येथे मद्य प्राशन करणाऱ्या दोघांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या भाट्ये समुद्र किनारी सुरुच्या बनातील एका पडीक इमारतीमध्ये मद्य प्राशन करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मन्सूर अब्दूल लतीफ साखरकर (वय ४३) नौशाद अब्दूल लतीफ मुल्ला (वय ४२, दोघे रा. जामा मस्जीद जवळ, भाट्ये, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास भाट्ये येथे निदर्शनास आली. पोलिस नाईक प्रवीण पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


भरणे अपघातातील तरुणाची प्रकृती गंभीर
खेड ः खेड-भरणे मार्गावरील आठवडाबाजार नजीक झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अरविंद काटकर या दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयातउपचार सुरू आहेत. खेड येथून भरणे येथे जात असताना अचानक गाय आडवी आल्याने तिला वाचवण्याच्या नादात ताबा सुटून हा अपघात घडला. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या काटकर यास कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून अधिक उपचारासाठी डेरवण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.