खेडला भातपिकाचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडला भातपिकाचे नुकसान
खेडला भातपिकाचे नुकसान

खेडला भातपिकाचे नुकसान

sakal_logo
By

खेडला भातपिकाचे नुकसान
खेड, ता.१३ ः तालुक्याला परतीच्या पावसाचा चांगलाच तडाखा बसला. ग्रामीण भागासह शहरात झालेल्या मुसळधार पावसाने भातपिकाचे नुकसान झाले. सुमारे दोन तास पडलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. ग्रामीण भागात हातातोंडाशी आलेले भातपिक मात्र आडवे झाल्याने याचा फटका शेतकरीवर्गाला बसला. याबाबत नेमके किती नुकसान झाले याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता तर दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर वातावरण ढगाळ होते.