कोंडुरा तिठा, दांडेलीत पथदीपांचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडुरा तिठा, दांडेलीत पथदीपांचे लोकार्पण
कोंडुरा तिठा, दांडेलीत पथदीपांचे लोकार्पण

कोंडुरा तिठा, दांडेलीत पथदीपांचे लोकार्पण

sakal_logo
By

swt1316.jpg
56230
कोंडुराः पथदीप लोकार्पण प्रसंगी ग्रामस्थांसोबत राजू मुळीक.

कोंडुरा तिठा, दांडेलीत
पथदीपांचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ः गेल्या पाच वर्षांत मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली. रस्ते व पथदीपांची समस्या लक्षात घेत प्रामुख्याने त्यावर अधिक भर दिला. त्यामुळे आज दांडेली-खोतवाडी, कोंडुरा तिठा परिसर उजेडात आला, असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी केले.
जिल्हा परिषद स्वनिधीतून दांडेली-खोतवाडी, कोंडुरा तिठा परिसरात पथदीप कार्यान्वित करण्यात आले. त्याचे लोकार्पण मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती संदीप नेमळेकर, आरोस सरपंच शंकर नाईक, न्हावेली माजी सरपंच शरद धाउसकर, दांडेली माजी सरपंच बाळा मोरजकर, माजी उपसरपंच योगेश नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी खोत, आरोस ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक, मळेवाड ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक, रवींद्र मुळीक, संभाजी मुळीक, सुमंत मुळीक, प्रीतेश मुळीक, सुधीर मुळीक, बंटी खोत, दिनेश खोत, उमेश खोत, किरण खोत, शैलेश खोत, चिंतामणी खोत, सुनील खोत, दिनकर तेली, दिनेश बोंद्रे, रामदास पांगम, आपा पालयेकर, विकास शेगडे, गणेश खोत, दत्ता शेगडे, हेमंत मुळीक उपस्थित होते. सूत्रसंचालन तानाजी खोत यांनी केले. आभार योगेश नाईक यांनी मानले.