बोगस रेल्वे भरती फसवणूक प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस रेल्वे भरती फसवणूक प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता
बोगस रेल्वे भरती फसवणूक प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता

बोगस रेल्वे भरती फसवणूक प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता

sakal_logo
By

बोगस रेल्वे भरती फसवणूक
प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता
कणकवली, ता. १३ः रेल्वे अधिकाऱ्याच्या वाहनावर चालक असल्याचे भासवून रेल्वेत नोकरीस लावतो, असे सांगून अकरा जणांकडून १८ लाख रुपये स्विकारले होते. तसेच अधिकाऱ्याच्या नावाची नेमणूक पत्रे देऊन फसवणूक केली होती. हा प्रकार २०११ मध्ये घडला होता. या संदर्भात सुरु असलेल्या खटल्यातून कणकवली न्यायालयाने शहरातील सिध्दार्थनगर येथील रत्नु कांबळे याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी रत्नू कांबळे याच्यावतीने ॲड. विलास परब, ॲड तुषार परब, ॲड. भालचंद्र पाटील, ॲड मेघना सावंत, ॲड. प्रियांका परब यांनी काम पाहीले. कणकवली येथील तरुणांना रेल्वेत टी.सी. म्हणून नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी एक ते तीन लाख रुपये त्याने स्वीकारले होते.