राजपथ संचलनासाठी माही साटमची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजपथ संचलनासाठी माही साटमची निवड
राजपथ संचलनासाठी माही साटमची निवड

राजपथ संचलनासाठी माही साटमची निवड

sakal_logo
By

swt१३२०.jpg
५६२४९
शिरगांवः एनसीसी अधिकाऱ्यांसह माही साटम.

राजपथ संचलनासाठी
माही साटमची निवड
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ ः तालुक्यातील शिरगांव हायस्कूलची विद्यार्थिनी ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. विभागाची कॅडेट माही साटम हिची राज्यस्तरीय ‘राजपथ संचलन’ कॅम्पसाठी निवड झाली आहे. येत्या २६ जानेवारीला दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात ती सहभाग घेणार आहे. सप्टेंबरमध्ये ओरोस येथे जिल्हास्तरीय आरडीसी (रिपब्लिक डे) कॅम्प झाला. त्यानंतर कोल्हापूर येथे विभागीय आयजीसी आरडीसी कॅम्प झाला. यामधून १७ ऑक्टोबरपासून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘राजपथ संचलन’ कॅम्पसाठी माही हिची निवड झाली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावर जो संचलनाचा सोहळा होतो, त्यामधून देशभरातून एनसीसी कॅडेट सहभागी होतात. त्यांची राज्यस्तरावर अंतिम निवड चाचणी या कॅम्पमधून होते. माही हिला एनसीसी विभागाचे वीरसिंग पावरा, एनसीसी माजी विद्यार्थिनी सरस्वती धुरी, विश्वजीत दिनेश साटम, दीपक वरक यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण कर्ले, शाळा समिती अध्यक्ष राजन चव्हाण, संस्था पदाधिकारी, प्राचार्य शमशुद्दीन आतार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे यांनी अभिनंदन केले.