रत्नागिरी- क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- क्राईम
रत्नागिरी- क्राईम

रत्नागिरी- क्राईम

sakal_logo
By

पान ३ साठी)

सॅनिटाझर प्यायलेल्या महिलेचा मृत्यू
रत्नागिरी, ता. १३ ः वाटद-खंडाळा येथे पाणी समजून सॅनिटाझर प्यायलेल्या नेपाळी महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. तुलसीदास पद्म लामा (वय २७, मुळ. रा. नेपाळ, सध्या वाटद-खंडाळा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी (ता. ११) सकाळी अकरा वाजता तुलसीदास हिने राहत्या घरी पाणी समजून सॅनिटायझरचे प्राशन केले होते. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने पती पदम रामबहाद्दूर लामा (वय २६ रा. वाटद, खंडाळा) याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारदरम्यान बुधवारी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती पद्म लामा यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.