सामाजिक कार्यकर्त्यांना ‘ऋणाई’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक कार्यकर्त्यांना ‘ऋणाई’
सामाजिक कार्यकर्त्यांना ‘ऋणाई’

सामाजिक कार्यकर्त्यांना ‘ऋणाई’

sakal_logo
By

56510
कणकवली ः रुग्णांना फळे वाटप करताना साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली नाईक. समवेत अन्य.

सामाजिक कार्यकर्त्यांना ‘ऋणाई’

कणकवलीत ‘साद’चा पुढाकार; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

बांदा, ता. १५ ः माजी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण महादेव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजातील गरजू, होतकरू, अन्यायग्रस्त आणि वंचित घटकांना स्वतःसह समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून मदत व्हावी, यासाठी बहुउद्देशीय अशी ‘साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ संस्था प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांनी स्थापन केली. या संस्थेंतर्गत नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘ऋणाई’ पुरस्कार देऊन समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केले.
माजी ग्रामविकास अधिकारी भाई ऊर्फ मनोहर मडव, आई लतिका नाईक, भाऊ गौरेश नाईक यांच्या हस्ते कणकवली येथे कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पोलिस निरीक्षक बापू खोत, ज्येष्ठ साहित्यिक व कवी अजय कांडर, अभिनेते नीलेश पवार, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. प्रशांत मडव, पत्रकार राजन चव्हाण, निवेदक राजेश कदम, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे सत्यवान मडवी, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत शिक्षक अच्युत देसाई, समाजसेविका अर्पिता मुंबरकर आदींना सन्मानित केले.
‘साद’च्या अध्यक्षा गीतांजली नाईक सध्या कुडाळ नगरपंचायतीमध्ये प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वडील माजी ग्रामविकास अधिकारी (कै.) लक्ष्मण नाईक यांनी वारगाव, ओसरगाव, बोर्डवे, कसाल, वाघेरी, पियाळी, खारेपाटण या गावांतून ग्रामसेवक म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यामुळेच त्यांना तत्कालीन माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सूक्ष्म व लघुउद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार मिळाला होता. वडिलांच्या कामाची प्रेरणा घेऊन गीतांजली यांनी कुटुंबाच्या सहकार्याने चौथीनंतरचे शिक्षण पूर्ण करत स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून प्रशासकीय अधिकारी पद मिळविले.
दरम्यान, लक्ष्मण नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी माजी ग्रामविकास अधिकारी मनोहर मडव, प्रा. अपूर्वा गोलतकर, कणकवली पंचायत समिती शिक्षण विभागाचे हेड क्लार्क आनंद जाधव, चैतन्य क्लासचे संचालक अच्युत देसाई, युनिक ॲकॅडमी, कणकवली प्रमुख सचिन कोर्लेकर उपस्थित होते.