वाचन प्रेरणा दिनानिमित्त सिंधुदुर्गनरीत ग्रंथप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचन प्रेरणा दिनानिमित्त
सिंधुदुर्गनरीत ग्रंथप्रदर्शन
वाचन प्रेरणा दिनानिमित्त सिंधुदुर्गनरीत ग्रंथप्रदर्शन

वाचन प्रेरणा दिनानिमित्त सिंधुदुर्गनरीत ग्रंथप्रदर्शन

sakal_logo
By

56527
सिंधुदुर्गनगरी ः ग्रंथप्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना डॉ. शिवप्रसाद खोत.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त
सिंधुदुर्गनगरीत ग्रंथप्रदर्शन
सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा झाला. जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, तांत्रिक सहायक प्रतिभा ताटे आदी उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शनात विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विविध विषयांचे ग्रंथ आहेत. हे ग्रंथप्रदर्शन सार्वजनिक सुटी वगळता मंगळवारपर्यंत (ता. १८) कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी खुले राहील. वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
............
ओरोसला उद्या कामगारांची सभा
कुडाळ ः बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सिंधुदुर्ग संघटनेतील कार्यकारिणी सदस्यांची व जिल्ह्यातील सक्रिय बांधकाम कामगार कार्यकर्त्यांची सहविचार सभा सोमवारी (ता. १७) सकाळी दहाला संघटनेच्या रवळनाथ मंदिर, ओरोस येथील मुख्य कार्यालयात आयोजित केली आहे. तळागाळातील कामगारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट साधून संघटनेच्या कार्यक्षेत्र वाढीसाठी उपसमिती स्थापन करणे, बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांसंदर्भातील अन्यायकारक नियम व अर्ज मंजुरीची क्लिष्ट पद्धतीवर चर्चा करणे, २०१८ व २०१९ मधील शैक्षणिक शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी शासन दरबारी निवेदन देणे व निर्णय घेण्यास भाग पाडणे, संघटनेची २०२३ साठी दिनदर्शिका प्रकाशित करणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. सर्व बांधकाम कामगार कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी केले आहे.