चिपळूण नागरीने गाठला 1 हजार कोटी ठेवींचा टप्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण नागरीने गाठला 1 हजार कोटी ठेवींचा टप्पा
चिपळूण नागरीने गाठला 1 हजार कोटी ठेवींचा टप्पा

चिपळूण नागरीने गाठला 1 हजार कोटी ठेवींचा टप्पा

sakal_logo
By

ratchl१५१.jpg
५६५२०
सुभाषराव चव्हाण
-------------

चिपळूण नागरीने गाठला
एक हजार कोटी ठेवींचा टप्पा
रोपट्याचा झाला वटवृक्ष; आज वर्धापन
चिपळूण, ता. १५ः चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी १९ ऑक्टोबर १९९३ ला संस्थेने लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यासाठी सुभाषराव चव्हाण यांचे कुशल नेतृत्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांचे अचूक नियोजन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे पतसंस्थेने केवळ २९ वर्षात १ हजार कोटी ठेवींचा पल्ला गाठला आहे. या निमित्ताने संस्थेचा ३० वा वर्धापनदिन व १ हजार कोटी ठेवी पूर्तता सोहळा रविवारी (ता. १६) सकाळी १० वाजता सहकार भवनातील ‘सहकार सभागृहात’ होणार आहे.
संस्थेने ''आपली माणसे आपली संस्था'' या ब्रीदवाक्याप्रमाणे गरजू, सुशिक्षित बेरोजगारांना छोटे-छोटे व्यवसाय उभे करणे, याचबरोबर शेतीपूरक दुग्ध व्यवसायाकरिता शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करून सर्वांना स्वावलंबी केले आहे. अध्यक्ष चव्हाण यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने २९ वर्षांपूर्वी परकार कॉम्प्लेक्समध्ये छोट्याशा गाळ्यात पतसंस्थेचा प्रारंभ केला. या संस्थेचा कारभार बहाद्दूरशेख नाका येथील मुख्य प्रधान कार्यालयाबरोबरच ५० शाखांतून यशस्वीपणे सुरू आहे. अनेकांच्या आधाराचा, रोजगाराचा आणि सामाजिक बांधिलकीचा ही एक आर्थिक संस्था चालवताना सुभाषराव चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी कसोशीने जपली आहे. या कार्याची दखल घेऊन अध्यक्ष चव्हाण यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव व संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वसामान्यांना बचतीची सवय व्हावी व भविष्यातील आर्थिक चणचण दूर होण्यासाठी ३१ बचत योजना सुरू असून त्यास लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. गेली २३ वर्षे सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी कोकणात नव्हे तर महाराष्ट्रात आघाडीवर राहिली आहे.

चौकट
१८ कोटी ७६ लाखाचा नफा
संस्थेची सभासद संख्या १ लाख ३४ हजार ४४६, भाग भांडवल ६३ कोटी ९३ लाख रुपये, स्वनिधी १२८ कोटी ६० लाख, ठेवी १००१ कोटी ५९ लाख, कर्जे ७९६ कोटी ४२ लाख, पैकी प्लेज लोन ३५१ कोटी ४० लाख, पैकी सोने कर्ज ३०३ कोटी ८० लाख, गुंतवणुका ३१२ कोटी ५४ लाख, मालमत्ता ३० कोटी ८७ लाख, निव्वळ नफा मार्च २२ अखेर १८ कोटी ७६ लाख रुपये या पद्धतीने संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

कोट
हजार कोटींचा टप्पा गाटल्याने तितकीच मोठी जबाबदारीपण वाढली आहे. इतके लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, प्रतिसाद देतात त्या वेळी नक्कीच आपण अजून चांगले काम करणार आहोत. आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी ठेव उद्दिष्टपूर्ततेचा आनंद मेळावा, वर्धापनदिन, सेफ लॉकर्स सुविधेचा उद्घाटन सोहळा रविवारी सकाळी १० वाजता संस्थेच्या सहकार भावनातील सहकार सभागृहात होत आहे.
- सपना यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी