पंचायत समितीचे ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचायत समितीचे ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण
पंचायत समितीचे ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण

पंचायत समितीचे ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण

sakal_logo
By

rat१५p९.jpg
५६४९८
गुहागरःपंचायत समितीचे ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित कर्मचारी.
-------------
ग्रामरोजगार सेवकांना प्रशिक्षण
गुहागरमध्ये उपक्रम; खामशेतमध्ये घेतला प्रत्यक्ष कामाचा अनुभव
गुहागर, ता. १५ः पंचायत समितीमार्फत १० ते १२ ऑक्टोबर असे तीन दिवस खास प्रशिक्षण गुहागर तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांना दिले गेले. १० ऑक्टोबरला गुहागर येथे पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी प्रशांत राऊत व प्रमोद केळुस्कर यांच्या सहकार्याने प्रशिक्षणाचा आरंभ झाला.
दुसऱ्या दिवशी खामशेत गावात प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात आला. गावफेरी, शिवारफेरी, पाहिजे त्याला काम, कुटुंब सर्वेक्षण यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सरपंच मंगेश सोलकर यांनी गावामध्ये कशाप्रकारे मनरेगाअंतर्गत कामे केली व त्यासाठी काय काय नियोजन व अंमलबजावणी करावी लागते याबाबत मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना जिल्हा परिषद रत्नागिरीचे नरेगा सहाय्यक कार्यकारी अधिकारी साळुंखे व जिल्हा परिषद रत्नागिरीचे नरेगा गटविकास अधिकारी जाधव यांच्या हस्ते समारोप करण्यात आला. प्रशिक्षणार्थींना प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद पुणे येथील गोपाळ शर्मा व साईराज प्रधान हे लाभले होते. त्यांनी ग्रामरोजगार सेवकांचे कार्य तसेच मनरेगामार्फत अनेक रोजगार उपलब्ध करून गावातील सर्व घटक, ग्रामस्थ शेतकरी यांचा आर्थिक स्तर वाढवून गावातील प्रत्येक कुटुंब कसे समृद्ध करता येईल व विकासाच्या दिशेने ‘स्वतः समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर तालुका, तालुका समृद्ध तर जिल्हा आणि जिल्हा समृद्ध तर पूर्ण महाराष्ट्र समृद्ध’, अशा पद्धतीने विकास साध्य करता येईल असे सांगून त्याकरिता अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळुस्कर यांनीदेखील प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी तालुका कृषी अधिकारी कोळी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, पंचायत समिती नरेगा विभागाच्या तांत्रिक अधिकारी नयना जाधव, गुहागर तहसील विभाग अधिकारी, खामशेत गावचे पोलिसपाटील, ग्रामसेवक तसेच सरपंच मंगेश सोलकर उपस्थित होते.