वामनराव महाडीक यांना तळेरे येथे आदरांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वामनराव महाडीक यांना 
तळेरे येथे आदरांजली
वामनराव महाडीक यांना तळेरे येथे आदरांजली

वामनराव महाडीक यांना तळेरे येथे आदरांजली

sakal_logo
By

56550
तळेरे ः वामनराव महाडिक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना मान्यवर.

वामनराव महाडिक यांना
तळेरे येथे आदरांजली
तळेरे, ता. १५ ः वामनराव महाडिक हे ज्ञानाचा अथांग सागर होते. त्यांची विद्वता, राजकीय इतिहास आणि विचारांचा ठेवा जपून ठेवा, असे उद्‌गार तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक-अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांनी काढले.
येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थापक वामनराव महाडिक यांच्या २३ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शाळा समिती सदस्य प्रवीण वरुणकर, नीलेश सोरप, संतोष तळेकर, प्रशालेसाठी जमीन देणगीदार हितेंद्र खटावकर, जयेश ढेकणे, प्रतीकेश तळेकर, चंद्रकांत तळेकर, प्राचार्य अविनाश मांजरेकर, पत्रकार संजय खानविलकर, सतीश मदभावे, प्रमोद कोयंडे, ज्येष्ठ शिक्षक सी. व्ही. काटे, डी. सी. तळेकर, एन. बी. तडवी, पी. एम. पाटील, पी. एन. काणेकर, प्राध्यापिका ए. बी. कानकेकर, ए. पी. कोकरे, एन. पी. गावठे, व्ही. डी. टाकळे, ए. बी. तांबे, एस. यू. सुर्वे, एस. एन. जाधव, शिक्षकेतर कर्मचारी आर. जी. तांबे, के. डी. तळेकर, प्रकाश घाडी, देवेंद्र तळेकर, संदेश तळेकर उपस्थित होते. ‘निसर्गमित्र परिवारा’चे अध्यक्ष संजय खानविलकर यांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. गावठे यांनी सूत्रसंचालन केले. सहायक शिक्षिका पी. एम. पाटील यांनी आभार मानले.