रेल्वे स्टेशन रोड कॉंक्रिटचा करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे स्टेशन रोड कॉंक्रिटचा करण्याची मागणी
रेल्वे स्टेशन रोड कॉंक्रिटचा करण्याची मागणी

रेल्वे स्टेशन रोड कॉंक्रिटचा करण्याची मागणी

sakal_logo
By

rat15p14.jpg
56557
रत्नागिरी : रेल्वे स्टेशन रोड कॉंक्रिटचा करण्याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघातर्फे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना राजू भाटलेकर.
----------
रेल्वे स्टेशन रोड काँक्रिटचा करण्याची मागणी
कोकण रेल्वे प्रवासी संघ; प्रवाशांसह पर्यटकही नाराज
रत्नागिरी, ता. १५ : रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते रेल्वेस्टेशन फाट्यापर्यंतचा रस्ता गेली अनेक वर्षे खड्डेमय असल्याने तो सिमेंट कॉंक्रीटचा करण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाने राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी आज निवेदन दिले. दैनिक सकाळने या खड्ड्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवला होता. त्याची दखल घेत प्रवासी संघाने ही मागणी केली आहे.
रत्नागिरी रेल्वेस्टेशन हे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून कोकण रेल्वे मार्गावरून राज्य व राज्याबाहेरील रेल्वे ये-जा करीत असतात. त्यामुळे हजारो स्थानिक प्रवासी व पर्यटक रत्नागिरी रेल्वेस्टेशनवरून रेल्वेमध्ये चढ-उतार करत असतात. त्यामुळे या रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची व त्याचबरोबर चालत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. या रस्त्याची अवस्था गेली काही वर्षे बिकट झाली आहे.
या रस्त्याला कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता होणे गरजे आहे. तो प्रवाशांना व वाहनचालकांना खराब, खड्डेमय रस्त्याच्या त्रासातून कामयची सुटका होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून याला तत्काळ निधी उपलब्ध करून तो मंजूर करण्यात यावा. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी कोकण रेल्वे प्रवाशांतर्फे विनंती करतो, असे भाटलेकर यांनी सांगितले.