रत्नागिरीतील चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीतील चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
रत्नागिरीतील चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

रत्नागिरीतील चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

sakal_logo
By

चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
९६ उमेदवार रिंगणात ; महाआघाडीविरुद्ध शिंदे गटात सामना
रत्नागिरी, ता. १५ ः तालुक्यातील चार ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १६) मतदान होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीविरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटामध्येच जोरदार चुरस होणार आहे. यात सर्वांत जास्त शिरगाव आणि फणसोप ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली आहे. ३ ग्रामपंचायतींच्या एकूण ४६ जागांसाठी रिंगणात असलेल्या ९६ उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.
तालुक्यातील चरवेली, फणसोप, शिरगाव आणि पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली. चरवेली गावात गावपॅनेलमार्फत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र शिरगाव, फणसोप आणि पोमेंडी बुद्रुक या ठिकाणी निवडणुकीचे
घमासान रंगणार आहे. तिन्ही ठिकाणी महाविकास आघाडीविरुद्ध भाजप आणि शिंदे गट युतीचा सामना रंगणार आहे तर लक्षवेधी राहिलेल्या
शिरगाव गावच्या सरपंचपदासाठी चौरंगी लढत रंगणार आहे. गेले दोन आठवडा गावपातळीवर प्रचाराचा धुरळा उडाला. आज गुप्त प्रचारावर
भर दिला जाणार आहे. फणसोप ग्रामपंचायीतमध्ये ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सरपंचपदासह उर्वरित ५ जागांसाठी निवडणूक होणार
आहे. यामध्ये शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी जोरदार टक्कर होणार आहे.
पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे जोरदार वर्चस्व आहे. त्यामुळे तिथे सेनेची सत्ता येणार असे चित्र आहे. शिंदे गटाचेही काही प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. शिरगांव ग्रामपंचायत निवडणूक महाविकास आघाडी आणि शिंदे गटाने प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनचे अनेक
पदाधिकारी तेथे तळ ठोकून आहेत तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी ४
उमेदवार रिंगणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे.
---------------
चौकट-
रिंगणात असलेले उमेदवार
फणसोप- ११ जागांसाठी १७ उमेदवार
पोमेंडी बुद्रुक- ११ जागांसाठी ३१ उमेदवार
शिरगाव- १७ जागांसाठी ४१ उमेदवार