गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर गुन्हा
गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर गुन्हा

गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर गुन्हा

sakal_logo
By

गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर गुन्हा
रत्नागिरीः जेलरोड येथील बीएसएनएल ऑफिससमोरील गार्डनजवळ गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई शुक्रवार १४ ऑक्टोबरला करण्यात आली. अरफान सलीम साखरकर (२२, रा. भाटये, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार दीपराज पाटील यांनी तक्रार दिली आहे. शुक्रवारी तो बीएसएनएल ऑफिससमोरील गार्डनजवळ गांजाचे सेवन करत होता. त्याच्याकडून तीन ग्रॅम गांजा जप्त केला असून, अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रवीण वीर करत आहेत.