मालवाहू ट्रकला मळगावात अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवाहू ट्रकला 
मळगावात अपघात
मालवाहू ट्रकला मळगावात अपघात

मालवाहू ट्रकला मळगावात अपघात

sakal_logo
By

56622
अपघातग्रस्त ट्रक.

मालवाहू ट्रकला
मळगावात अपघात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक पलटी होऊन अपघात झाला. ही घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव-रेडकरवाडी परिसरात घडली.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकसह आतील सामानाचे नुकसान झाले. तर ट्रक झाडावर अडकून राहिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघाताची सावंतवाडी पोलिसांत नोंद नाही. अपघातग्रस्त ट्रक मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. यावेळी चालकाला अचानक झोप लागल्यामुळे त्याचा ट्रकवरील ताबा सुटून तो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यावेळी सुदैवाने झाडाचा आधार मिळाल्याने ट्रक अधांतरी राहून मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.