बांद्यात २३ ला नरकासुर स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात २३ ला नरकासुर स्पर्धा
बांद्यात २३ ला नरकासुर स्पर्धा

बांद्यात २३ ला नरकासुर स्पर्धा

sakal_logo
By

बांद्यात २३ ला नरकासुर स्पर्धा
बांदा ः येथील आमचीवाडी देऊळवाडी मित्रमंडळ, बांदा यांच्यावतीने नरक चतुर्दशीनिमित्त २३ ला खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले आहे. रात्री ८ ते १० वाजता ही स्पर्धा श्री देव बांदेश्वर मंदिरजवळ होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १००००, ५०००, २००० रुपये रोख व चतुर्थ तसेच पाचव्या क्रमांक विजेत्यांना प्रत्येकी १००० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धा विनामूल्य असून अधिक माहितीसाठी गुरुनाथ साळगावकर किंवा आशिष सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--
वालावलला वन्यजीव सप्ताह
कुडाळ ः सामाजिक वनीकरण विभागातर्फे वन्यजीव सप्ताहानिमित्त वालावल येथील एन. ए. एस. डी. विद्यालयात जाणीव जागृतीपर कार्यक्रम झाला. सामाजिक वनीकरणचे कुडाळ विभागाचे वनपाल सुनील सावंत यांनी छायाचित्रांद्वारे वन्यजीवांची माहिती देत त्यांच्या अन्नसाखळीचे महत्त्व विशद केले. भारतात आणलेल्या ‘चित्ता’ या प्राण्याचीही माहिती दिली. त्यांच्यासमवेत नेरुर तर्फ हवेलीचे वनपाल धुळू कोळेकर, नेरुरचे वन कर्मचारी यशवंत कदम उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय हरित सेनेचे मास्टर ट्रेनर भाग्यविधाता वारंग यांनी केले. दुर्वा प्रभू हिने स्वागत केले. मुख्याध्यापक नारायण कोठावळे यांनीही मनोगत व्यक्त केले. संतोष गोसावी, विशाल कदम, शिवानी ठाकूर, गुरुप्रसाद शिरसाट तसेच पाचवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. समीक्षा फडके हिने आभार मानले.
---------------
रुग्णवाहिका चालक वेतनाविना
कणकवली ः शासकीय रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेल्या चालकांना गेल्या तीन महिन्यांपासून ठेकेदाराकडून पगार देण्यात आला नाही. जिल्ह्यातील असे सहा चालक अडचणीत सापडले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत लक्ष घालून तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. मे महिन्यापासून त्यांचा न झालेला पगार गणेशोत्सवादरम्यान झाला; मात्र अद्यापही तीन महिन्यांचा त्यांचा पगार झालेला नाही. मुळातच अशा ठेकेदारांतर्गत काम करणाऱ्या चालकांना पगार तुटपुंजा असतो. त्यातही तीनचार महिने पगार होत नसेल तर त्यांनी कुटुंब चालवायचे कसे? याबाबत मात्र कुणीच उत्तर देत नाही. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लक्ष घालून लवकर पगार अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
---
माळगावात २२ ला भजनी डबलबारी
मालवण ः धनत्रयोदशीनिमित्त येथील आदर्श रिक्षा संघटना आणि ग्रामस्थांतर्फे २२ ला रात्री नऊला बागायत माळगाव बाजारपेठ येथे डबलबारी भजन सामना आयोजित केला आहे. हा सामना स्वामी समर्थ संगीत भजन मंडळ, भांडुपचे बुवा सुशील गोठणकर (पखवाज- तुषार लोट, तबला-योगेश गोठणकर) व कोटेश्वर नवतरुण भजन मंडळ, हरकुळ बुद्रुकचे बुवा अभिषेक शिरसाट (पखवाज-रुपेश परब, तबला-हितेश पिळणकर) यांच्यात होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन आदर्श रिक्षा संघटनेने केले आहे.