तेलाच्या भडक्यामुळे फरसाण भट्टी खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेलाच्या भडक्यामुळे
फरसाण भट्टी खाक
तेलाच्या भडक्यामुळे फरसाण भट्टी खाक

तेलाच्या भडक्यामुळे फरसाण भट्टी खाक

sakal_logo
By

56624
चराठा ः जळून खाक झालेली फरसाण भट्टी.

तेलाच्या भडक्यामुळे
फरसाण भट्टी खाक

चराठा-गावठाणवाडीतील घटना

सावंतवाडी, ता. १५ ः चराठा-गावठाणवाडी येथे बांदेकर ब्रदर्सच्या लाडू, फरसाण बनवण्याच्या भट्टीत तेलाच्या कढईने अचानक पेट घेतल्यामुळे भीषण आग लागली. ही घटना आज दुपारी घडली. यात भट्टीसह इमारत जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे पावणे तीन लाखांचे नुकसान झाले; सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. बेकरीच्या मालक राधिका बांदेकर यांच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. या धक्क्यातून सावरत त्यांनी आताच या व्यवसायात जम बसविला होता. या घटनेमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
..............
56625
सावंतवाडी ः आमदार शहाजीबापू पाटील यांचे स्वागत करताना संजू परब.

आमदार शहाजीबापूंचे
सावंतवाडीत स्वागत

सावंतवाडी, ता. १५ ः शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी सावंतवाडीला भेट दिली. यावेळी गवळी तिठा येथे भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले. भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगसेवक राजू बेग, माजी नगराध्यक्ष अनोरोजीन लोबो, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, माजी नगरसेवक आनंद नेगवी, बंटी पुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर, अमित परब, अजय सावंत, अनिल सावंत, पिंट्या सावंत, केतन आजगावकर, सत्यवान बांदेकर, अशोक दळवी, भाऊ नाटेकर, बबन राणे, महेश पांचाळ, राज वेरकर, गुरू सावंत, जितू गावकर आदी उपस्थित होते.