शाहू महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू महाराज
शाहू महाराज

शाहू महाराज

sakal_logo
By

मराठा आरक्षणासाठी मोदींची
भेट घेण्याची हीच वेळ

शाहू महाराज ः पुरोगामी दिशेने पुढे जावे


कोल्हापूर, ता. १५ : मराठा आरक्षणाचा तिढा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच सोडवू शकत असल्याने, त्यांची भेट घेण्याची हीच वेळ आहे. अन्यथा मराठा आरक्षण कधीच मिळणार नाही, असे सूतोवाच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना जोडण्याचे वसंतराव मुळीक यांचे कार्य अद्वितीय असून, समविचारी व्यक्तींना एकत्र करून पुरोगामी दिशेने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या कार्यकर्तृत्त्वाच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुळीक यांचा मराठा महासंघाचे स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. शाहू महाराज म्हणाले, ‘देशात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहत आहेत. त्यांच्यात दरी निर्माण करून देशाची विभागणी पुन्हा होते की काय, असे चित्र आहे. समतेच्या दिशेने पावले टाकल्यास समाजाची प्रगती होणार आहे. शाहूंच्या नगरीत सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊ शकतात, हे मुळीक यांनी दाखवून दिले आहे.’ आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘मुळीक हे लोकप्रियतेचे प्रतिक असून, मराठा समाजासाठी निरपेक्ष वृत्तीने काम करत आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काढलेले मोर्चे जगभर गाजले आहेत.’