कणकवली :व्यसनमुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :व्यसनमुक्ती
कणकवली :व्यसनमुक्ती

कणकवली :व्यसनमुक्ती

sakal_logo
By

कणकवली अभियांत्रिकी
महाविद्यालयात व्यसनमुक्ती दिन
कणकवली, ता. १६ ः येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाविद्यालयात नुकताच व्यसनमुक्ती दिन साजरा केला. स्वयंसेवकांकरिता ‘ओरिएंटेशन’ कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख वक्त्या, महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक अर्पिता मुंबरकर यांनी मार्गदर्शन केले. व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीची आवश्यकता व व्यसनमुक्तीकडे सोप्या पद्धतीने कसे जाता येते, याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी सानिका सरदेसाई, मदन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, राष्ट्रीय सेवा योजनाप्रमुख डॉ. एस. टी. माने, प्रा. अरविंद कुडतरकर, संगणक विभागप्रमुख प्रा. सुप्रिया नलावडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.