सदर ः शिक्षण लोकल टु ग्लोबल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः शिक्षण लोकल टु ग्लोबल
सदर ः शिक्षण लोकल टु ग्लोबल

सदर ः शिक्षण लोकल टु ग्लोबल

sakal_logo
By

११ ऑक्टोबर टुडे पान ३ वरून लोगो व लेखकाचा फोटो घेणे
शिक्षण ः लोकल टू ग्लोबल---लोगो

फोटो ओळी
-rat१६p८.jpg ः गजानन पाटील
-----------

इंट्रो

अध्यापनशास्त्र हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा गाभा आहे. तणावमुक्त वातावरणामध्ये अध्ययन घडून यावे यासाठी विविध पद्धतींमागील अध्यापनशास्त्र माहिती असणे आवश्यक आहे. आजपर्यंत व्याख्यान पद्धती, पाठ्यपुस्तक केंद्रित चर्चा व खडू-फळा यांच्याशी संबंधित पद्धतींचा वापर केला जात आहे. या पद्धती अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी खूप कमी प्रमाणात प्रभावी ठरतात; परंतु काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या गरजा व संदर्भ यानुसार अध्यापनशास्त्राचा वापर करतात किंवा स्वतः असे अध्यापनशास्त्र विकसित करतात. त्यास नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्र असे संबोधता येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर बदलणाऱ्या अध्ययन अध्यापनाच्या गरजा आणि येणारे नवीन विचारप्रवाह यांचा विचार करून अध्ययनार्थी केंद्रित अध्ययन अध्यापनशास्त्राचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने शिक्षकांना अशा नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती व त्याचे अध्यापनशास्त्र या विषयी मार्गदर्शन मिळावे आणि प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनामध्ये त्यांचा वापर व्हावा यासाठी शिक्षकपर्व हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावरून आयोजित करण्यात आला आहे.

- डॉ. गजानन पाटील
---------------

शिक्षकपर्व ः नाविन्यपूर्ण अध्यापन दिग्दर्शन उपक्रम

अध्ययनार्थीला आनंददायी पद्धतीने त्याच्या गरजांचा विचार करून तसेच त्याच्या सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीचा विचार करून अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्राचा वापर करून बहुविद्याशाखीय, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देणाऱ्या अध्ययन-अध्यापन पद्धतींचे शिक्षकांना ज्ञान व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राज्यातील डायटमार्फत राबवण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक डायटमार्फत नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित दिग्दर्शन पाठ व आंतरक्रियात्मक सत्र घेण्यात आले. डायट रत्नागिरीने अशा पद्धतीची सत्रे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेतली. यामध्ये जिल्ह्यातील २५३ केंद्रांमध्ये मॉडेल लेसन घेण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरीमधील प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सधन व्यक्तींना मार्गदर्शन करून साधन व्यक्तींनी प्रत्येक तालुकास्तरावरील शिक्षण परिषदेमध्ये मॉडेल पाठाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून सादरीकरण केले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ प्रत्येक तालुक्यातील साधन व्यक्तींच्या गटाने तयार केलेल्या यु ट्यूब चॅनेलवर अपलोड केले. त्याचा उपयोग २५३ केंद्रातील सर्व शिक्षकांना होणार आहे. या सत्रासाठी नावीन्यपूर्ण आनंददायी तसेच अध्ययनार्थ्याला गुंतवून ठेवणाऱ्या पद्धतींचा वापर करण्यात आला. त्यासाठी प्रत्येक विषयनिहाय अध्यापन पद्धतींचे वेळापत्रक डायटकडून तयार केले गेले. यामध्ये ज्ञानरचनावाद, सहकार्यात्मक अध्ययन, सहाध्यायी अध्ययन, अनुभवात्मक अध्ययन, खेळ आधारित अध्यापनशास्त्र, तंत्रज्ञान अनुदेशित अध्यापन पद्धती, पृच्छा पद्धती, स्वयंअध्ययनास चालना देणाऱ्या अध्यापन पद्धतींचा वापर करण्यात आला होता तसेच ज्या अध्ययन निष्पत्तींवर काम करणे आवश्यक आहे (NAS, अध्ययन स्तर निश्चिती यांच्या आधारे) अशा अध्ययन निष्पत्तींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला होता. विशेष म्हणजे सदर नियोजन करत असताना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या गरजा, निवडण्यात आलेल्या विषयाशी संबंधित अध्यापनशास्त्र यांचाही विचार करण्यात आला होता. शिक्षकपर्व कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शकांना नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्र संकल्पना, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती व त्यामागील अध्यापनशास्त्र, त्यांचा अध्ययन-अध्यापनातील वापर, त्यातून साध्य होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती यांची सविस्तर माहिती देण्यात आली होती. कोणत्याही एका नावीन्यपूर्ण पद्धतीवर आधारित किमान २० मिनिटे कालावधीचा डेमो घेण्यासाठीचे नियोजन करण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने तज्ञ मार्गदर्शकांनी घेतलेले सत्राचे व्हिडिओ, सहभागी शाळांमार्फत किंवा शाळेतील शिक्षकांमार्फत किमान चार ते पाच फोटो, सत्राविषयीच्या कमाल ५०० शब्दांच्या मर्यादेतील अभिप्राय व माहितीसह विद्याअमृत पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून अध्यापन पद्धतीत आमुलाग्र बदल घडून येणार आहे.

(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)