साखरपा-पूर्वा आठल्ये, ऋग्वेद रेमाणे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा-पूर्वा आठल्ये, ऋग्वेद रेमाणे प्रथम
साखरपा-पूर्वा आठल्ये, ऋग्वेद रेमाणे प्रथम

साखरपा-पूर्वा आठल्ये, ऋग्वेद रेमाणे प्रथम

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat16p16.jpg-KOP22L56716 साखरपा : बक्षीस स्वीकारताना पूर्वा अनिरुद्ध आठल्ये.
------------

पुस्तक परिचय वक्तृत्व स्पर्धेत
पूर्वा आठल्ये, ऋग्वेद रेमाणे प्रथम
साखरपा, ता १६ : वाचन प्रेरणा दिनानीमित्य आयोजित पुस्तक परिचय वक्तृत्व स्पर्धेत पूर्वा आठल्ये आणि ऋग्वेद रेमाणे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या देवरुख शाखेच्या साखरपा विभागातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती साखरपा येथे साजरी करण्यात आली. त्यानिमित्या कोमसापच्या साखरपा विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वाचलेल्या पुस्तकाचा परिचय ह्या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. ह्या स्पर्धेत पाच शाळांमधील 24 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण आबासाहेब सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास पाटील आणि शिक्षक अभिमन्यु शिंदे यांनी केले. पाचवी ते सातवी गटात पूर्वा अनिरुद्ध आठल्ये हिने श्यामची आई या पुस्तकाचे परीक्षण करून प्रथम क्रमांक पटाकावला. या गटात समृद्धी बाईंग, ऋतुजा सुतार यांनी द्वितीय आणि तृतीय तर साई चव्हाण आणि विहार भोसले यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. आठवी ते दहावी हयागटाचे विजेतेपद ऋग्वेद केदार रेमणे याने बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्राच्या परिचयाने पटकावले. त्याच गटात भार्गवी सुर्वे हिने द्वितीय तर गौरी सावंत आणि श्रुष्टी वाजे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. स्पर्धेला कोमसाप देवरूख शाखेचे अध्यक्ष दीपक लिंगायत, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, साखरपा विभागप्रमुख अमित पंडित, हर्षा आठल्ये, साखरपा केंद्राचे प्रभारी केंद्रीय प्रमुख सहदेव पाटील, शिक्षक उमेश डावरे, बाबासाहेब लाड, रेवती पंडित, मैत्रेयी रेमणे, सतीश वाकसे, प्रभा जाधव आदी उपस्थित होते.