रत्नागिरी- प्रयोगशाळेतील अपघात टाळण्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- प्रयोगशाळेतील अपघात टाळण्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा
रत्नागिरी- प्रयोगशाळेतील अपघात टाळण्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा

रत्नागिरी- प्रयोगशाळेतील अपघात टाळण्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा

sakal_logo
By

प्रयोगशाळेत अपघात टाळण्याचे प्रशिक्षण
रत्नागिरी, ता. १६ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रशिक्षण समिती यांच्यातर्फे अपघात कसे टाळावेत या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले. या प्रसंगी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, शिक्षक प्रशिक्षण समितीचे समन्वयक डॉ. महेश बेळेकर, डॉ. एम. जी. गोरे, डीबीटी समन्वयक डॉ. विवेक भिडे व प्रमुख व्याख्याते डॉ. प्रबोध चोबे उपस्थित होते.
या वेळी डॉ. प्रबोध चोबे यांनी पहिल्या सत्रामध्ये अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कशा प्रकारे काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली. त्यांना आलेले अनुभव, केमिकल वापरताना पेहराव कसा असावा, याविषयी दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रामध्ये प्रत्यक्षात प्रयोगशाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्याना गोष्टींची पाहणी करायला सांगत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सत्र पूर्ण केले. कार्यक्रमाला गोगटे- जोगळेकर महाविद्यालायचे ३० शिक्षक, ३४ शिक्षकेतर कर्मचारी, २०० विद्यार्थी व ४ क्लस्टर महाविद्यालयांचे ६ प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त केली. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी समारोपाच्या कार्यक्रमात अशी आशा व्यक्त केली की आजपर्यंत शून्य अपघाताचे प्रमाण आहे. तसेच याहीपुढे अजून काळजी घेऊन ते टिकवण्याचे प्रयत्न महाविद्यालय नक्की करेल. सूत्रसंचालन डॉ. सोनाली कदम यांनी केले. आभार प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मधुरा मुकादम यांनी केले.