rat1610.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat1610.txt
rat1610.txt

rat1610.txt

sakal_logo
By

जिल्ह्यात २६,७०९ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ
५० हजार पर्यंत फायदा ; नियमित कर्ज फेड आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः राज्य शासनाने २०१९ मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची योजना जाहीर केली होती. त्यातील २०१७ पासून पुढील तीन वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजारपर्यंतचा लाभ मिळणार असून ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पहिल्या टप्यातील लाभार्थ्यांची यादी राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणानंतर ही रक्कम बचत खात्यात वर्ग होईल. एकूण २६ हजार ७०९ कर्जदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर देण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील २१ हजार ५५० लाभार्थांचा तर राष्ट्रीयकृत बॅंकेतील ५ हजार १५६ कर्जदारांचा समावेश आहे. त्यातील पहिल्या टप्यातील ६ हजार २४९ लाभाथ्यांना लाभ मिळणार आहे. आधार प्रमाणीकरणासाठी जाताना कर्जदाराने आपले आधार कार्ड, विशिष्ठ क्रमांक, बॅंक पासबुक आदी कागदपत्रे सोबत ठेवावी. आधार प्रमाणीकरणासाठी सरकार सेवा केंद्रातून कोणतेही शुल्क आकारला जाणार नाही. आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येत असल्यात त्याबाबत ऑनलाईन तक्रार प्रणालीद्वारे पोर्टलवर दाखल करता येईल. विशिष्ठ क्रमांक अमान्य असल्यास आणि लाभाची रक्कम अमान्य असल्यास ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर समितीकडे तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करता येणार आहे. प्रमाणीकरणाची प्रक्रिया १९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेदर सिंह, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे व जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी केले आहे.