चिपळूण-चिपळुणात आज भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-चिपळुणात आज भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा
चिपळूण-चिपळुणात आज भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा

चिपळूण-चिपळुणात आज भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा

sakal_logo
By

भाजप कार्यकर्त्यांचा आज
चिपळुणात संवाद मेळावा
चिपळूण, ता. १६ ः भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा सोमवारी (ता. १७) दुपारी ३ वाजता शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ येथे आयोजित करण्यात आला आहे. आगामी काळात भाजपने शहरामध्ये कशा पद्धतीने काम करावे, कार्यकर्त्यांच्या समस्या काय आहेत. हे जाणून घेत त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने तयार करण्यासाठी हा संवाद मेळावा होत असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष आशिष खातू यांनी दिली.
मेळाव्यास भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे, कोकण विभाग संघटक शैलेंद्र दळवी, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे, निलम गोंधळी उपस्थित राहणार आहेत. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारांची चाचपणी आणि प्रभागातील कार्यकर्त्यांची बांधणी सुरू आहे. भाजपने सेवा पंधरवडानिमित्त शहरात विविध कार्यक्रम राबवले. यातून कार्यकर्त्यांची बांधणी आणि भाजपचा प्रचार आणि प्रसार शहरात करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच चिपळुणात बैठक घेऊन गुहागर आणि चिपळूणमधील भाजपच्या कामाचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांना संघटना बांधण्यासाठी कानमंत्र दिला होता. त्यामुळे संवाद मेळाव्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याना रिचार्ज केले जाणार आहे.