खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

डबलडेकरला
चार अतिरिक्त डबे
खेड ः दीपावली सुट्टीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव डबलडेकर साप्ताहिक एक्स्प्रेसला ४ अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबरपासून डबल डेकर एक्स्प्रेस १६ एलएचबी डब्यांची धावणार आहे. १५ ते २९ ऑक्टोबर व परतीच्या प्रवासात १६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत डबलडेकर एक्स्प्रेसला ४ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
------

प्रा. दळवींना पुरस्कार प्रदान
खेड ः मोरवंडे येथील ज्ञानदीप महाविद्यालयात वर्ल्ड आर्किटेक्चर डे कार्यक्रमात प्रा. गुरूनाथ दळवी यांना ‘ज्ञानदीप उत्कृष्टता पुरस्कार'' संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी व सरचिटणीस प्रकाश गुजराथी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. प्रा. दळवी आर्किटेक्चर शिक्षण क्षेत्रात गेल्या ६ दशकापासून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक संस्थामध्ये मार्गदर्शन करत आर्किटेक्चर व कला क्षेत्रात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. या वेळी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा, मुख्याध्यापक भरत मोरे, प्राचार्य राजकुमार मगदूम, प्रा. डॉ. उमेशकुमार बागल, सीतारामपंत जामकर आदी उपस्थित होते.
---------------

खेड लायन्स क्लबतर्फे
सेवाकार्य सप्ताह
खेड ः लायन्स क्लबतर्फे शहरात सेवाकार्य सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. ज्येष्ठ नागरिक व बचतगटातील महिलांसाठी मधुमेह तपासणी शिबिर घेण्यात आले. चिंचघर हायस्कूलमधील किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील कुपोषित बालके शोधून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. खेड रेल्वे स्थानकातील प्रत्येक रिक्षा व्यावसायिकास फस्ट अॅड बॉक्स देण्यात आला. बसस्थानकातून ज्या बसेस वस्तीसाठी जातात, त्या प्रत्येक बसफेरीसही फस्ट अँड बॉक्स देण्यात आला.