भोसले पॉलिटेक्निकमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसले पॉलिटेक्निकमध्ये 
वाचन प्रेरणा दिन उत्साहात
भोसले पॉलिटेक्निकमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

भोसले पॉलिटेक्निकमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

sakal_logo
By

56694

जाहीरात बातमी

टीपः swt1611.jpg मध्ये फोटो आहे.


‘भोसले पॉलिटेक्निक’मध्ये
वाचन प्रेरणा दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीप्रीत्यर्थ वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य गजानन भोसले व प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन झाले. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यानिमित्त आपल्या आवडत्या पुस्तकाचा आशय प्रतिकृतीद्वारे मांडण्यासाठी ‘प्रतिबिंब पुस्तकाचे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्व स्पर्धकांनी आपली आवडती पुस्तके व आशयाच्या कलाकृती संस्थेच्या ग्रंथालयामध्ये मांडल्या होत्या. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रंथपाल मानसी कुडतरकर, सहायक शरद घारे यांनी परिश्रम घेतले. प्रा. अमर प्रभू यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.