बालवयातच संस्कारांची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालवयातच संस्कारांची गरज
बालवयातच संस्कारांची गरज

बालवयातच संस्कारांची गरज

sakal_logo
By

56737
सावंतवाडी ः निवासी अभ्यास वर्गाचे उद्‍घाटन करताना भावना गवळी. सोबत अॅड. नकुल पार्सेकर आदी.

बालवयातच संस्कारांची गरज

भावना गवळी ः सावंतवाडीत निवासी अभ्यास वर्ग

सावंतवाडी, ता. १६ ः दिवसेंदिवस समाजाची बदलेली मानसिकता, बदलती जीवनशैली, एकत्र कुटुंब पद्धतीचा अभाव आणि भारतीय संस्कृतीकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे समाज आणि कुटुंबात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वैचारिक अधिष्ठान मजबूत असेल तर आदर्श कुटुंब आणि पर्यायाने सामाजिक प्रगल्भताही मजबूत होते. यासाठी बालपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार गरजेचे असून यासाठी विद्या भारती सतत प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन विद्या भारती शिशुवाटिका विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रमुख भावना गवळी यांनी केले.
त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिशुवाटिकेच्या सर्व दीदींच्या निवासी अभ्यास वर्गाच्या उद्‍घाटन प्रसंगी बोलत होत्या. अटल प्रतिष्ठान संचलित राष्ट्रसाधना सांस्कृतिक सभागृह मराठवाडा सावंतवाडी येथे अभ्यास वर्ग झाला. अटल प्रतिष्ठान संचलित शिशुवाटिकेच्या प्रधानाचार्या विजया रामाणे यांनी प्रास्ताविक केले. विद्या भारती सिंधुदुर्ग सहसचिव विवेक मुतालिक यांनी निवासी प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. पालकांचे प्रबोधन करायचे असेल तर दीदीही अपडेट झाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांनी अभ्यास वर्गासाठी जिल्हाभरातून आलेल्या दीदींना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर, शिशुवाटिका विभागाच्या व्यवस्थापिका डॉ. रश्मी कार्लेकर आदी उपस्थित होते.