फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

56808
मळेवाड ः मराठे कुटुंबियाचे सांत्वन करताना निलेश राणे, संजू परब.

मराठे कुटुंबाचे राणेंकडून सांत्वन
सावंतवाडी ः मळेवाड कोंडुरे उपसरपंच तथा पत्रकार हेमंत मराठे यांचे वडील रमाकांत मराठे यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आज हेमंत मराठे यांच्या मळेवाड हेदुलवाडी येथील निवासस्थानी भेट देत मराठे कुटुंबियांचे सांत्वन केले. मराठे व त्यांचे भाऊ श्रीप्रसाद मराठे यांना त्यांनी यावेळी धीर दिला. यावेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, मकरंद तोरसकर आदी उपस्थित होते.
---
56740
विकास सावंत

सावंतांवर ‘भारत जोडो’ची जबाबदारी
सावंतवाडी ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी जिल्हा निहाय जबाबदारी निश्चित केली आहे. कोकण विभागातील नेत्यांचा यात समावेश असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांचे नाव या यादीत आहे. ‘भारत छोडो’ यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक राज्यातून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात यासाठी जिल्हा निहाय निवड करण्यात आली आहे. कोकण विभागात प्रत्येक जिल्ह्याला जबाबदारी दिली असून सिंधुदुर्गातून माजी जिल्हाध्यक्ष सावंत यांचे नाव निश्चित केले आहे. ठाणे ग्रामीण व भिवंडीमधून सुभाष कानडे, रत्नागिरी-हुस्नबानो खलिपे, नवी मुंबई पनवेल-रमाकांत म्हात्रे, ठाणे शहर-मनोज शिंदे, कल्याण-ब्रिजकिशोर दत्त, रायगड- प्रवीण ठाकूर,पालघर वसई-विजय पाटील यांचे नाव निश्चित केले आहे.