संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

कणकवली-निगडी बस २२ पासून
कणकवली ः दिवाळी सणानिमित्त कणकवली आगारातून २२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत कणकवली ते निगडी ही जादा गाडी सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी कणकवली आगारातून दुपारी १.३० वाजता सुटणार असून दुसर्‍या दिवशी निगडीतून सकाळी ८.३० वाजता सुटेल. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांनी केले आहे.

केळकर महाविद्यालयातर्फे ''गोष्टरंग'' कथाकथन स्पर्धा
देवगड ः येथील स. ह. केळकर महाविद्यालय आणि न. शा. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने ''गोष्टरंग'' ही आंतरराज्य मराठी कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आठ विभागांमध्ये प्राथमिक फेरी तसेच महाअंतिम फेरी अशा दोन फेर्‍यांमध्ये घेण्यात येईल. स्पर्धेची प्राथमिक फेरी ११ व १२ नोव्हेंबर या काळात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. महाअंतिम फेरीची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. यातील पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५० हजार, ३० हजार व १५ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येतील. तसेच प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास १ हजार व सहभागी विद्यार्थ्यांस सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. नावनोंदणी ५ नोव्हेंबरपूर्वी करावी. अधिक माहितीसाठी मिलिंद भिडे किंवा राजेश तेली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.