‘उधना-मेंगलोर’ २३ ला धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उधना-मेंगलोर’ २३ ला धावणार
‘उधना-मेंगलोर’ २३ ला धावणार

‘उधना-मेंगलोर’ २३ ला धावणार

sakal_logo
By

‘उधना-मेंगलोर’ २३ ला धावणार
कणकवली ः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनातर्फे उधना-मेंगलोर-उधना अशी गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने धावणाऱ्या या गाडीला सिंधुदुर्गातील चार स्थानकावर थांबा आहे. उधना-मेंगलोर (०९०५७) २३ व ३० ऑक्टोबरला रात्री ८ वाजता उधना येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मेंगलोर येथे पोहोचेल. मेंगलोर-उधना (०९०५८) २४ व ३१ ऑक्टोबरला रात्री ८.४५ वाजता मेंगलोर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.१५ वाजता उधना येथे पोहोचेल. गाडीला वलसाड, वापी, पालघर, वसई, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, सावंतवाडी, थिविम, कुडाळ, करमळी, मडगप्व, कारवार, कुमटा, भटकाल, उडपी, मुलकी, सुरतकल आदी स्थानकांवर थांबा असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
--
पिकुळेत दीपावली ‘शो टाईम’
दोडामार्ग ः पिकुळे-मधलीवाडी येथील श्री गणेश मंदिरात २९ व ३० ला दीपावली ‘शो टाईम’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी सायंकाळी चारला आकाश कंदील स्पर्धा (प्रथम पारितोषिक ७०१, द्वितीय ५०१), रांगोळी स्पर्धा (प्रथम ५५५ रुपये, द्वितीय ३३३ रुपये, तृतीय २२२ रुपये) होणार आहे. रात्री ८.३० वाजता नृत्य स्पर्धा (खुला वर्ग) होणार असून यासाठी प्रथम ३३३३ व चषक, द्वितीय २२२२ व चषक, तृतीय ११११ व चषक अशी बक्षिसे आहेत. त्यानंतर स्थानिक कलाकार मिमिक्री आर्टिस्ट विजय फाले यांचा कार्यक्रम, रविवारी सायंकाळी ५ वाजता फनी गेम्स, रात्री ९ वाजता पिकुळे गावस्तरीय १८ वर्षांखालील नृत्य स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी राजन देसाई, प्रशांत गवस यांच्याशी संपर्क साधावा.
--
कळसुली, नरडवेत वन्यजीव सप्ताह
कणकवली ः कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या दिगवळे परिमंडळ वनअधिकारी यांच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त कळसुली हायस्कूल व न्यू इंग्लिश स्कूल नरडवे येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी चित्रफितीद्वारे वन्य प्राण्यांची माहिती देण्यात आली. सोमनाथ पाटील यांनी प्राण्यांचे आवाज काढतानाच मार्गदर्शनही केले. वनपाल टी. बी. दळवी, एस. डी. साटम, वनरक्षक एस. के. गळवे, पी. आर. शिंदे, श्रीमती पी. बी. दाभाडे, वनरक्षक सुद्रिक आदी उपस्थित होते.
--
एक्स्प्रेसला जादा बोगी
कणकवली ः प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या भावनगर-कोचुवेली एकदिवसीय एक्स्प्रेसला एकदिवसीय स्लीपर स्वरुपाची एक जादा बोगी जोडण्यात येत आहे. त्यानुसार १८ ऑक्टोबरची भावनगर कोचुवेली (१९२६०) व २० ऑक्टोबरची भावनगर (१९२५९) एक जादा बोगीनिशी धावणार आहे. या साप्ताहिक गाडीला सिंधुदुर्गात सिंधुदुर्गनगरी स्थानकावर थांबा आहे.