चिपळूण ःबाऊ न करता जगणारे समाजाला आदर्शवत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ःबाऊ न करता जगणारे समाजाला आदर्शवत
चिपळूण ःबाऊ न करता जगणारे समाजाला आदर्शवत

चिपळूण ःबाऊ न करता जगणारे समाजाला आदर्शवत

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl१६१.jpg- KOP२२L५६७६३
चिपळूण ः दृष्टीबाधितांना पांढऱ्या काठीचे वाटप करताना पोलिस निरीक्षक शिंदे, सुचयअण्णा रेडीज आदी.
-ratchl१६२.jpg- KOP२२L५६७६४ महामार्गावर सुरक्षित झेब्रा रोड क्रॉसिंग करताना दृष्टीबाधित बांधव व पदाधिकारी.
-------------------

बाऊ न करता जगणारे समाजाला आदर्शवत

रवींद्र शिंदे ः दृष्टीबाधितांना पांढऱ्या काठीचे वाटप

सकाळ-नॅबतर्फे जागतिक अंध सहाय्यता दिन--लोगो

चिपळूण, ता. १६ ः ज्यांचे शरीर दणकट आहे, घरी आर्थिक सुबत्ता आहे, अशाच कुटुबांतील अनेक लोक निराशेच्या गर्तेत जाऊन जीवन संपवतात. मात्र जन्मतः आलेले अंधत्व अथवा दिव्यांग बांधव परिस्थितीचा बाऊ न करता, प्राप्त परिस्थितीवर मात करून जीवनाची वाटचाल ठेवतात. हे बांधव समाजासाठी खरे आदर्शवत असल्याचे मत पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी नॅब येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
सकाळ माध्यम समुह आणि नॅब आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नॅबमध्ये जागतिक अंध सहाय्यता दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. पांढरी काठी ही दृष्टीबाधित लोकांची ओळख आहे. त्यामुळे दृष्टीबाधितांनी समाजात वावरताना सुरक्षिततेसाठी नेहमी पांढऱ्या काठीचा वापर करावा, यासाठी यानिमित्ताने जनजागृती करण्यात आली. चिपळूणसह, खेड, दापोलीहून आलेल्या दृष्टीबाधितांना गॉगल्स आणि पांढऱ्या काठीचे वाटप करण्यात आले. त्याबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नॅबचे विकास अधिकारी संदीप नलावडे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करीत जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
श्री. शिंदे म्हणाले, सकाळ माध्यम समुह, नॅबतर्फे राबविण्यात येणारे उपक्रम समाजाला प्रेरणादायी आहेत. अलीकडच्या काळात चांगली आर्थिक सुबत्ता असणारी कुटुंबे देखील निराशेच्या गर्तेत जातात. काहीजण व्यसनाच्या आहारी जातात. मात्र दृष्टीबाधित, दिव्यांग कुटुंबे परिस्थतीवर मात करून जीवनाची वाटचाल करण्यावर भर देतात. अनेक कुटंबे स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. या बांधवाना माझा सलाम आहे. खरं तर समाजाने या बांधवांचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी. महाविद्यालयीन तरुणांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा. दृष्टीबाधित, दिव्यांगाच्या पुनर्वनासाठी भावी पिढीनेही पुढाकार घ्यायला हवा.
सकाळचे सहायक वितरण व्यवस्थापक पांडुरंग साळवी यांनी सकाळतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानिमित्ताने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर झेब्रा रोड क्रॉसिंगचा कार्यक्रम झाला. दृष्टीबाधित बांधव रस्ता क्रॉस करताना समाजानेही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास नॅबचे अध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, संचालक संचालक नीलेश भुरण, दादा खातू, प्रकाश पाथरे, सलिम पालोजी, भरत नांदगावकर, विकास अधिकारी संदीप नलावडे, संतोष पाटील, सकाळचे प्रतिनिधी नागेश पाटील आदी उपस्थित होते.
------
चौकट
दृष्टीबाधितांचे जीवन प्रकाशमान होण्यासाठी प्रयत्न ः रेडीज
नॅबचे चेअरमन सुचयअण्णा रेडीज म्हणाले, ‘संस्थेच्या माध्यमातून कोकणातील अंध व दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. त्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय दृष्टीबाधित तरुण, तरुणींचे विवाह होण्यासाठी देखील संस्था प्रयत्नशील असते. संस्थेच्या भरीव कामगिरीमुळे जिल्ह्यात एकही दृष्टीबाधित बांधव भीक मागताना दिसणार नाही इतकी काळजी घेतली जाते.’