दाभोळ-फणसू, नवसे, वडगाववर शिंदे गटाचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-फणसू, नवसे, वडगाववर शिंदे गटाचे वर्चस्व
दाभोळ-फणसू, नवसे, वडगाववर शिंदे गटाचे वर्चस्व

दाभोळ-फणसू, नवसे, वडगाववर शिंदे गटाचे वर्चस्व

sakal_logo
By

फणसू, नवसे, वडगाववर शिंदे गटाचे वर्चस्व
आमदार कदमांचा दावा ; कोकणातील पहिला विजय
दाभोळ, ता. १६ : दापोली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीर झालेल्या दहा ग्रामपंचायतीपैकी दापोली तालुक्यातील फणसू व नवसे, खेड तालुक्यातील वडगाव या तीन ग्रामपंचायती बिनविरोध होऊन त्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकल्याचा दावा आमदार योगेश कदम यांनी केला आहे. आमदार योगेश कदम यांच्या दापोली येथील संपर्क कार्यालयात बिनविरोध निवडून आलेले नवसे ग्रामंपचायतींचे सरपंच शोएब मुकादम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, फणसू ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आमदार योगेश कदम यांचे हस्ते करण्यात आला. या वेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा हा कोकणातील पहिला विजय असून अन्य ७ ग्रामपंचायतींवरही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकेल, असा दावा करतानाच जनतेने सत्याच्या बाजूने कौल दिल्याचे कदम यांनी सांगितले.