राजापूर-तालिमखाना-जवाहरचौक रस्त्याची चाळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-तालिमखाना-जवाहरचौक रस्त्याची चाळण
राजापूर-तालिमखाना-जवाहरचौक रस्त्याची चाळण

राजापूर-तालिमखाना-जवाहरचौक रस्त्याची चाळण

sakal_logo
By

rat16p25.jpg-KOP22L56765
राजापूर ः राजापूर हायस्कूलच्या येथील तीव्र वळणावर रस्त्याची झालेली दुरवस्था.
-------------

तालिमखाना-जवाहरचौक रस्त्याची चाळण
राजापूर, ता. १६ ः तालिमखाना ते जवाहरचौक या शहरातील मुख्य रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यामुळे पुरती चाळण झाली आहे. उताराचा अन् वळणांचा असलेल्या या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. खड्डेमय झाल्याने प्रवासासाठी अधिक धोकादायक झालेल्या या रस्त्याचे लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी वाहन चालकांसह सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
तालिमखाना ते जवाहरचौक या शहरातील मुख्य रस्ता असून या रस्त्याने वाहनांची सतत मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात खड्डे पडतात. त्याप्रमाणे यावर्षी या रस्त्यामध्ये मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. मोठ्या खड्ड्यांमुळे उताराचा आणि वळणांचा असलेला हा रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक झाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या फंडातून रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी वारंवार करण्यात येणारी खोदाई हेही एक महत्वाचे कारण मानले जात आहे. भविष्यामध्ये पुन्हा रस्त्याची खोदाई होवू नये अन् त्यातून रस्ता पुन्हा खराब होवू नये म्हणून रस्त्याच्या बाजूने असलेल्या जलवाहिनीवरून त्या-त्या परिसरातील लोकांना नळजोडण्या देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जलवाहिनीवरून नळजोडण्या देण्याचे काम लवकरात लवकर उरकून रस्त्याचे काम सुरू व्हावे, अशी मागणी वाहनचालकांसह सर्वसामान्यांमधून केली जात आहे.