चिपळूण-महाराष्ट्र संघाला दुहेरी विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-महाराष्ट्र संघाला दुहेरी विजेतेपद
चिपळूण-महाराष्ट्र संघाला दुहेरी विजेतेपद

चिपळूण-महाराष्ट्र संघाला दुहेरी विजेतेपद

sakal_logo
By

५६७९०
५६७९१
लोगो
सब ज्युनियर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा


महाराष्ट्र संघाला दुहेरी विजेतेपद
महाराष्ट्र संघ मुली व मिश्र गटात अव्वल ; मुलांच्या गटात उत्तरप्रदेशला विजेतेपद
चिपळूण, ता. १६ ः महाराष्ट्र संघाच्या मुलींनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत अंतिम फेरीत तामिळनाडू संघाचा १८ विरुद्ध ० गुणांनी दारुण पराभव केला, तर मिश्र गटात महाराष्ट्र संघाने मुलांच्या गटातील पराभवाचा वचपा काढीत उत्तरप्रदेश संघाचा एकतर्फी सामन्यात पराभव करीत सातव्या सब ज्युनियर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत दुहेरी विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटात उत्तरप्रदेश संघ अव्वल राहिला. कर्नाटक दुसरा, तर छत्तीसगड संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
तालुक्यातील डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेत मुलांच्या गटात २३, तर मुलींच्या गटात २० संघातील एकूण ५२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मुलांच्या गटात अंतिम फेरीत उत्तरप्रदेश विरुद्ध कर्नाटक असा चुरशीचा सामना झाला. यात उत्तरप्रदेश संघाने १५ विरुद्ध १२ अशा केवळ ३ गुणांनी विजय प्राप्त करीत विजेतेपद पटकावले. छत्तीसगड संघाने तिसरे स्थान प्राप्त केले. गटात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्र संघाला मात्र उपउपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रातील प्रज्ञा व स्नेहा माने, नीलू चव्हाण यांच्या जबरदस्त खेळीच्या बळावर संघाने तामिळनाडू संघावर १८ गुणांनी विजय मिळवला. महाराष्ट ब संघाने तिसरे स्थान पटकाविले.
मिश्र गटात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकाविले. बक्षीस वितरण डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी पी. एस. बरार, महाराष्ट्र डॉजबॉल संघटनचे सचिव प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे, उपाध्यक्ष राजेश जाधव, निरीक्षक ख़्वाजा अहमद, एसव्हीजेसीटीचे संचालक श्रीकांत पराडकर, स्पोर्ट्स कमिटी सदस्य विवेक सरस्वते, डॉ. जितेंन्द्र सप्रे, गुरवीर सिंग शाही आदींच्या उपस्थितीत झाले. विजयी संघाला अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कास्यपदकासह आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.