खेड-खेड क्रीडा संकुलातील कामे लवकरच मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-खेड क्रीडा संकुलातील कामे लवकरच मार्गी
खेड-खेड क्रीडा संकुलातील कामे लवकरच मार्गी

खेड-खेड क्रीडा संकुलातील कामे लवकरच मार्गी

sakal_logo
By

खेड क्रीडा संकुलातील कामे लवकरच मार्गी
तालुका क्रीडा अधिकाऱ्यांचे लेखीपत्र ; सामाजिक कार्यकर्ते मोरेंना उपोषण न करण्याचे आवाहन
खेड, ता. १६ : शहरातील महाडनाका येथील तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी सोयीसुविधा पुरवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर हाती घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्र तालुका क्रीडा अधिकारी रूही शिंगाडे यांनी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांना दिले असून उपोषणास बसू नये, असे आवाहनही केले आहे.
१० वर्षांपूर्वी उभारलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या इमारतीत खेळाडूंसाठी कोणत्याच प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे खेळाडूंची गैरसोय होवून त्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेता येत नसल्याची खंत मोरे यांनी १९ सप्टेंबरला प्रशासनाला निवेदनाद्वारे व्यक्त करत तालुका क्रीडा संकुलात २०० मीटर धावपथ, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, लांबउडी आदी खेळांसाठी मैदान तयार करण्याची मागणी केली होती.तालुका क्रीडा अधिकारी शिंगाडे यांनी मोरे यांना पत्र देऊन उपोषण न करण्याचे आवाहन केले आहे. क्रीडा संकुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून तसे अंदाजपत्रक व आराखडे प्राप्त झाले होते. आमदार तथा तालुका क्रीडा संकुल अध्यक्ष योगेश कदम यांनी झालेल्या सभेत आधीच्या बांधकामामधील कामाव्यतिरिक्त त्यात संरक्षक भिंत, मैदानात इलेक्ट्रिक काम व खेळासाठी लागणारी हायमास्ट लाईट, फुटबॉल मिनी मैदान, इमारतीची दुरुस्ती, इलेक्ट्रीक व रंगरंगोटीची कामे जोडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांचे संपूर्ण अंदाजपत्रक व आराखडे प्राप्त होवून मान्यता मिळताच क्रीडा संकुलातील सोयीसुविधांची कामे लवकरात लवकर हाती घेवून खेळाडूंची होणारी गैरसोय दूर करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.