खेड- क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड- क्राईम पट्टा
खेड- क्राईम पट्टा

खेड- क्राईम पट्टा

sakal_logo
By

पान ३ साठी, क्राईम

शेडमधून प्लायवुड कटिंग मशीन चोरीस
खेड : तालुक्यातील धामनदेवी हद्दीतील पुस्कर कंपनीच्या बाजूला असलेल्या लोखंडी पत्रा शेडमधून सुमारे १ हजार ५०० रुपयांची प्लायवूड कटिंग मशीन चोरून नेल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय अविनाश नाटूस्कर (रा. हेदवी, गुहागर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रोहन रमेश कदम (वय २२, रा. आवाशी), ओंकार रामचंद्र नागेश (४२, रा. लवेल) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. पत्र्याच्या शेडचा दरवाजा उचकटून या दोघांनी आतील मशिन चोरली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेडमध्ये वाहतुकीस अडथळा, टेंपोचालकावर गुन्हा
खेड : शहरातील गांधी चौक बाजारपेठमध्ये वाहतुकीस अडथळा ठरल्याप्रकरणी टेम्पो चालक ओकांर उदय धुळप (वय २३, रा. खेड) यांच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळप यांनी मालवाहू टेम्पो (एमएच-०८-एच-८८१५) शहरातील गांधी चौक येथे लावला होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता.

मनोरुग्णाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः प्रिंदावन (ता. राजापूर) येथील मनोरुग्णाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कमलाकर केशव घाटे (वय ५५, रा. तळेखाजन, प्रिंदावन, ता. राजापूर) असे मनोरुग्णाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालय येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घाटे हे मानसिक आजारी होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा मनोरुग्णालय रत्नागिरी येथे दाखल केले होते. मात्र त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी विकास गोदारा यांनी नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.