कणकवलीला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीला पावसाने झोडपले
कणकवलीला पावसाने झोडपले

कणकवलीला पावसाने झोडपले

sakal_logo
By

कणकवलीला पावसाने झोडपले
कणकवली,ता. १६ ः शहर आणि तालुक्यात आज दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने चांगले झोडपून काढले. मुसळधार परतीचा पाऊस कोसळत असून यामुळे नदी नाल्यांना पूरसदृश पाणी आले होते. परिसरातील रस्तेही पाण्याखाली गेले होते. आज सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. भात कापणीचा हंगाम सुरू असताना परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सुरू असून आज दुपारपासून कणकवली शहर आणि परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून होऊ लागले आहेत. शेतशिवारातही पाणी आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अधून मधून वीज गायब होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकरी ओल्या दुष्काळाची मागणी करू लागले आहेत. शेत शिवारातील पिकलेली भातरोपे आडवी झाली आहेत.