मंडणगड - खा. तटकरेंच्या पाठपुराव्याने स्वामित्व धनात कपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - खा. तटकरेंच्या पाठपुराव्याने स्वामित्व धनात कपात
मंडणगड - खा. तटकरेंच्या पाठपुराव्याने स्वामित्व धनात कपात

मंडणगड - खा. तटकरेंच्या पाठपुराव्याने स्वामित्व धनात कपात

sakal_logo
By

-rat16p33.jpg- KOP22L56801 मंडणगड : पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आमदार संजय कदम. शेजारी मुझफ्फर मुकादम, प्रकाश शिगवण, लुकमान चिखळकर.

खासदार तटकरेंमुळे स्वामित्व धनात कपात
संजय कदम ः स्थानिकांना होणार फायदा, कायदेशीर वाळू व्यवसायास चालना

मंडणगड, ता. १६ ः सावित्रीनदी बाणकोट खाडी पात्रात खासदार सुनील तटकरे यांनी तत्कालीन राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे बांधकामासाठी लागणाऱ्या वाळुच्या स्वामित्व धनात कपात झाल्याने नागरिकांना कमी दराने वाळू उपलब्ध झाली आहे. रायगडच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्याकडे स्वामित्व धन गोळा केले जावे, येथील वाळू व्यावसायिकांचे बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू व्हावेत, मजूर व वाळू व्यवसायावर अवलंबून असलेले सेवा उद्योग पुन्हा सुरू व्हावेत याचबरोबर येथील नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंडणगड येथील कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, माजी जि. प. सदस्य प्रकाश शिगवण, युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर उपस्थित होते. हातपाटी वाळू उपशाचे स्वामित्वधनाची रक्कम प्रति ब्रास साडेतीन हजार रुपये झाल्याने सर्वसामान्यांना घरासाठी लागणाऱ्या वाळुस सोन्याचा भाव आला होता. शासकीय लाभाच्या योजना मिळवून सुरू असलेली गरीबांची घरे वाळू उपलब्ध नसल्याने रखडले होते. यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व दर ६५० रुपये इतका कमी केला. याचा फायदा रायगड जिल्ह्याला झाला.
रेती गटातील पाण्याचा सिमांचा फायदा घेऊन मंडणगड तालुक्याच्या हद्दीतही मोठ्या प्रमाणावर रायगडमधील वाळू व्यावसायिकांकडून वाळू उपसा केला जातो. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात या ठिकाणासाठी कोणताही वाळू उपशाच्या निविदांची विक्री झालेली नाही. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात लिलावाचे अधिकार दिल्यास येथून जमा होणार महसूल जिल्ह्यातील गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींचे माध्यमातून खर्च केला जावू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने परत तपासणी करून जिल्ह्याच्या हद्दी नव्याने निश्चितत करून येथे वाळू उपशासाठी नव्याने गट निर्माण करावा. त्यातून निर्माण होणाऱ्या महसुलातून तालुक्यातील वाळु उपशाचा महसूल रत्नागिरी जिल्ह्यातील गावांच्या विकासासाठी खर्च होईल यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
----------
चौकट
स्थानिकांना रोजगारासाठी प्रयत्नशील ः मुकादम
मंडणगड तालुक्यातील स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा, तसेच खाडी परिसरातील ग्रामपंचायतींना त्याचा लाभ होवून विकासाला चालना मिळावी यासाठी विविध पातळींवर राष्ट्रवादी प्रयत्नशील असल्याचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी सांगितले. त्यासाठी खासदार तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करीत अनेक विकासात्मक बाबी पूर्णत्वास नेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे वाळूचे स्वामित्व धन कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची असलेली कामे मार्गी लागणार आहेत, असे मुकादम यांनी सांगितले.