रत्नागिरी-गावचे कारभारी आज ठरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-गावचे कारभारी आज ठरणार
रत्नागिरी-गावचे कारभारी आज ठरणार

रत्नागिरी-गावचे कारभारी आज ठरणार

sakal_logo
By

गावचे कारभारी आज ठरणार
३६ ग्रामपंचायतींची निवडणूक; सरासरी ६० टक्केच्यावर मतदान
रत्नागिरी, ता.१६ : जिल्ह्यात ३६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (ता.१६) सरासरी ६० टक्के मतदान झाले. गावागावातील कारभारी कोण याचा फैसला सोमवारी (ता. १७) सकाळी होणार आहे.
जिल्ह्यात ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. त्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. जिल्ह्यात प्रथमच चिपळूण तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात ग्रामीण भागातील लोकांना यश आले. पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन गाव विकासासाठी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. उर्वरित ३६ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. विशेषत: ठाकरे गट आणि महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि शिंदे गट, अशी लढत आहे. पक्षीय चिन्हांचा वापर नसला तरी ग्रामपंचायतीवर ताबा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी उत्सुक आहेत.