धनादेश न वटल्याने एकाला साधी शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनादेश न वटल्याने एकाला साधी शिक्षा
धनादेश न वटल्याने एकाला साधी शिक्षा

धनादेश न वटल्याने एकाला साधी शिक्षा

sakal_logo
By

धनादेश न वटल्याने एकाला साधी शिक्षा
खेड ः बँकेच्या कर्ज हप्त्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी कोर्ट उठेपर्यंत साध्या शिक्षेसह ५३ हजार ८०० रुपये दंड ठोठावला. ओंमकार राजेंद्र चिखले (रा. वाणीपेठ, खेड) असे संशयिताचे नाव आहे. चिखले याने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले होते. बँकेच्या वसुलीदरम्यान त्याने परत फेडीसाठी धनादेश दिला होता. हा धनादेश न वटल्याने त्याच्याविरुद्ध येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. ५३ हजार ८०० रुपये दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. बँकेच्या वतीने अॅड. संदेश वंदना चिकणे यांनी काम पाहिले.