शिरगावात पावसाने इमारतीचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरगावात पावसाने
इमारतीचे नुकसान
शिरगावात पावसाने इमारतीचे नुकसान

शिरगावात पावसाने इमारतीचे नुकसान

sakal_logo
By

शिरगावात पावसाने
इमारतीचे नुकसान
देवगड, ता. १६ ः तालुक्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. गेले चार दिवस येथे परतीच्या पावसाचा जोर सुरू आहे. त्यातच शिरगांव-अभयनगर येथील एका इमारतीच्या छपराचे सुमारे १ लाख २० हजाराचे नुकसान झाले. ही घटना काल (ता. १५) सायंकाळी घडली. येथील महसूल यंत्रणेने आज ही माहिती दिली. आजही काही भागात विजांमुळे विद्युत उपकरणांची हानी झाली.
काही दिवसांपासून किनारपट्टी भागात विजांच्या लखलखाटासह पाऊस कोसळतो. सकाळी कडकडीत ऊन, तर सायंकाळी परतीचा पाऊस असे चित्र असते. काल झालेल्या पावसामुळे शिरगांव-अभयनगर येथील एका इमारतीच्या छप्पराची कौले, पत्रे यांचे नुकसान झाले. महसूल यंत्रणेने याची पाहणी केली असून सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज सायंकाळी येथे ढगांचा गडगडाट करीत जोरदार विजा कोसळल्या. यामुळे विद्युत उपकरणांना हानी पोचल्याचे सांगितले जात होते. बराचवेळ पाऊस झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता.