तळवणेच्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळवणेच्या युवकाचा
विहिरीत पडून मृत्यू
तळवणेच्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

तळवणेच्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

sakal_logo
By

तळवणेच्या युवकाचा
विहिरीत पडून मृत्यू
सावंतवाडी, ता. १६ ः तोल जाऊन विहिरीत कोसळल्यामुळे तळवणे येथील १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. किरण वासुदेव गावडे, असे त्याचे नाव आहे. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी ही माहिती दिली. येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तळवणे-मठवाडीत किरणचे घर आहे. त्याच्या दारात विहीर आहे. त्या विहिरीत त्याचा मृतदेह आज सकाळी तरंगत्या अवस्थेत आढळला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसपाटलांनी येथील पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. तोल जाऊन तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित युवक आरोंदा येथील महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. किरणच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार असल्याचे सांगण्यात आले.