परतीच्या पावसाचा दोडामार्गला तडाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परतीच्या पावसाचा दोडामार्गला तडाखा
परतीच्या पावसाचा दोडामार्गला तडाखा

परतीच्या पावसाचा दोडामार्गला तडाखा

sakal_logo
By

56835
मुळस : हेवाळे पुलावर आलेले पाणी.

परतीच्या पावसाचा दोडामार्गला तडाखा
दोडामार्ग, ता. १७ : तालुक्यात आज अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. गडगडाटासह कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने तिलारी नदीची पातळी अचानक वाढली. मुळस-हेवाळे पूल त्यामुळे पाण्याखाली गेला. दुसरीकडे मणेरी-गौतमवाडी येथील सावित्री पेडणेकर यांच्या घरावर वीज पडून घरासह विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी पेडणेकर यांच्यासह त्यांचे पती व शेजारची एक व्यक्ती असे तिघेजण घरात होते. घरावर वीज पडताच छप्पर आणि वीज मीटर वायरिंगसह जळाला. सुदैवाने त्या तिघांना कोणतीही इजा झाली नाही; मात्र त्यांची भीतीने गाळण उडाली. मणेरी येथील सामजिक कार्यकर्ते भगवान गवस यांनी नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती दिली. तालुक्यात विजांच्या गडगडाटासह सुमारे तास दीडतास धुवाधार पाऊस कोसळला. तालुक्याचा आज आठवडा बाजार होता. पावसाने व्यापारी आणि ग्राहकांची पुरती दैना केली.