पडवणे, मळेगावमध्ये सरासरी ७० टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडवणे, मळेगावमध्ये
सरासरी ७० टक्के मतदान
पडवणे, मळेगावमध्ये सरासरी ७० टक्के मतदान

पडवणे, मळेगावमध्ये सरासरी ७० टक्के मतदान

sakal_logo
By

पडवणे, मळेगावमध्ये
सरासरी ७० टक्के मतदान
देवगड, ता. १६ ः तालुक्यातील पडवणे आणि मळेगाव ग्रामपंचायतींसाठी आज सरासरी ७० टक्के इतके मतदान झाले. दोन्ही ठिकाणी थेट सरपंच निवडणूक आहे. आज यासाठी मतदान घेतले गेले. यातील पडवणे ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत असून तेथे ७३.८१ टक्के इतके मतदान झाले आहे. तर मळेगावमध्ये दुरंगी लढतीसाठी ६६.२६ टक्के इतके मतदान झाले. दरम्यान, उद्या (ता.१७) सकाळी अकराला मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभागाने दिली.
या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी सात सदस्य संख्या आहे. तर सरपंच थेट जनतेमधून निवडून येणार असल्याने चुरस वाढली आहे. पडवणेमध्ये सरपंचपदासाठी तीन उमेदवार आहेत. सदस्यपदासाठी सात उमेदवारी अर्ज आल्याने यातील सदस्य बिनविरोध ठरणार आहेत. तसेच मळेगावमध्ये सरपंचपदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदासाठीच्या पाच जागा बिनविरोध ठरणार असून दोन जागांवर अर्ज आलेले नसल्याने त्या जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे पडवणे आणि मळेगाव या दोन्ही ठिकाणी केवळ सरपंचपदासाठी आज मतदान घेतले गेले. यातील पडवणे ग्रामपंचायतीमध्ये तीन उमेदवार, तर मळेगावमध्ये दोन उमेदवार रिंगणात आहेत.