एक्स्प्रेसला जादा बोगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक्स्प्रेसला जादा बोगी
एक्स्प्रेसला जादा बोगी

एक्स्प्रेसला जादा बोगी

sakal_logo
By

एक्स्प्रेसला जादा बोगी
कणकवली, ता. १६ ः प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या भावनगर-कोचुवेली एकदिवसीय एक्स्प्रेसला एकदिवसीय स्लीपर स्वरुपाची एक जादा बोगी जोडण्यात येत आहे. त्यानुसार १८ ऑक्टोबरची भावनगर कोचुवेली (१९२६०) व २० ऑक्टोबरची भावनगर (१९२५९) एक जादा बोगीनिशी धावणार आहे. या साप्ताहिक गाडीला सिंधुदुर्गात सिंधुदुर्गनगरी स्थानकावर थांबा आहे.
--
कणकवली-निगडी बस २२ पासून
कणकवली ः दिवाळी सणानिमित्त कणकवली आगारातून २२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत कणकवली ते निगडी ही जादा गाडी सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी कणकवली आगारातून दुपारी १.३० वाजता सुटणार असून दुसर्‍या दिवशी निगडीतून सकाळी ८.३० वाजता सुटेल. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांनी केले आहे.